– महिलादिनी महाविकास आघाडीतर्फे महिलांना साडी वाटप
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाविकास आघाडीच्या वतीने कार्यालय भामरागड येथे ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना साडी चोडीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी म्हणाले की, आज प्रत्येक स्त्री प्रगतीपथावर आहे. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे. स्त्रियांना अनेक संकटांना तोंड देत सामोरे जावे लागते. उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता महत्वाची महिलांनी निर्भयपणे संकटाचा सामना केला पाहिजे. पुढची पिढी कशी घडवावी हे महिलांच्याच हातात आहे. सर्व महान व्यक्तीच्या मागे स्त्रियानी खंबीरपणे उभे राहून घडवण्यासाठी मोलाचा वाटा होता. महिलांनी स्वतःच्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी हसनअली गिलानी, तालुका प्रमुख सुभाष घुटे, माजी नगराध्यक्ष राजू वाड्डे, सदस्य प्रकल्प समिती खुशाल मडावी, शिवसेना अहेरी विधानसभा उपसंघटिका पौर्णिमा पुरुषोत्तम इष्टाम, सदस्य प्रकल्प समिती लक्ष्मीकांत बोगमी, दिनेश मडावी, सामाजिक कार्यकर्ते भारती इष्टाम, सुनीता इष्टाम, तालुका प्रमुख प्रेमीला मडावी, सदस्य प्रकल्प समिती तानाजी धुर्वे, सुनीता मुदमा, अर्पणा सडमेक, बेबीताई पोरतेत, गजानन उईके, कांता येरमे, श्रुष्टी इष्टाम, सीता इष्टाम, मृणाली तलांडे, मनीष इष्टाम, जयश्री वेलादी, अदिती उईके, ममता आत्राम, संगीता इष्टाम, राजेश्वरी उईके, प्रीती मडावी, राजू मडावी, रत्ना मडावी, चोनी मासा, तोंडी वाला, शांता उसेंडी, आदी बहुसंख्येने महिला उपस्थित होते.