राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा करणारा : आमदार डॉ. देवरावजी होळी

81

– गडचिरोली जिल्ह्याला अर्थसंकल्पात काहीही मिळाले नाही

– केवळ विचाराधीन म्हणून विमानतळासाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही

– पोलीस रुग्णालयाची केवळ चर्चाच निधी मात्र नाही

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, गरीब ,मजदुर, व सर्वसामान्य जनता यांची घोर निराशा करणारा असून या अर्थसंकल्पातून गडचिरोली जिल्ह्याला काहीही मिळाले नसल्याची प्रतिक्रिया आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या अर्थसंकल्पावर दिली आहे.

राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात असताना त्यांच्या समाधानासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद यात नाही. शेतकऱ्यांच्या समाधानासाठी कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात नाही. कोरोणासारख्या महामारीतून निघणाऱ्या सर्वसामान्य गरीब मजदूर लोकांच्या कल्याणासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. गडचिरोली येथील विमानतळासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिलेले असताना याबाबतची कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नाही. पोलीस रुग्णालयाची केवळ चर्चाच करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी काहीही नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेची घोर निराशा करणारा असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केले आहे.