13 मार्चला जीवन सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रम

84

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे आयोजन 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त 13 मार्च 2022 रोज रविवारला गडचिरोली येथील पत्रकार भवनात भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे जीवन सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व आपल्या कार्याच्या माध्यमातून समाजावर आपली छटा उमटवून अन्य महिलांना एक आदर्श ठरणाऱ्या काही महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
भारतीय मानवाधिकार परिषद ही केंद्र शासनाच्या कार्पोरेट अफेयर्स मंत्रालयाशी नोंदणीकृत संस्था असून कंपनी कायदा 2013 कलम 8 अन्वये परवानगीप्राप्त संस्था आहे. मानव अधिकार याविषयी सहाय्य करणे, प्रचालन, संरक्षण करणे व हस्तक्षेप करणे हि संस्थेची मूूळ उद्दिष्टे आहेत.

गेल्या काही वर्षात भारतीय मानवाधिकार परिषदेने समाजप्रभावी असे अनेक प्रकल्प राबविले व सातत्याने मानव अधिकार क्षेत्रात सक्रिय राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. गेल्या दोन वर्षात देखील विविध सामाजिक व शासकिय संस्थांशी एकत्रीतपणे कोव्हीड 19 च्या महामारीत देखोल भारतीय मानवाधिकार परिषद सक्रिय राहिली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे यांनी केले आहे.