लॉयन्स क्लब गडचिरोलीतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चांदाळा येथे ‘तारुण्याच्या नाजूक वळणावर’ या कार्यक्रमाचे आयोजन

85

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दंडकारण्य शिक्षण संस्था द्वारा संचालित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन लॉयन्स क्लब गडचिरोलीतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती सविता सादमवार यांनी ‘तारुण्याच्या नाजूक वळणावर’ या विषयावर विद्यार्थिनींंशी संवाद साधला. मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचे जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरु होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करून घेणे तसेच कसलाही संकोच न बाळगता मन मोकळं करायला हवं आणि आपल्याला होणारा स्पर्श हा वाईट आहे की चांगला हे ओळखता येन्ं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, असे सविता सादमवार यांंनी आपल्या वक्तव्यातून सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती यशोधरा उसेंडी, तर प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स क्लबचे झोन चेअरपर्सन लॉ. शेषराव येलेकर, लॉयन्स क्लबच्या सचिव लॉ. मंजुषा मोरे, कोषाध्यक्ष लॉ. महेश बोरेवार, लॉ. स्मिता लडके, लॉ. संध्या येलेकर, ग्रामपंचायत सदस्या रुपाली कुमरे, श्रीमती.शोभा रामटेके, श्रीमती.रंजुताई उंदिरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या दर्शनीय भागात महिला दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मारोती पेन्ट्स अँड हार्डवेअर गडचिरोलीचे संचालक दीपक राठी यांच्याकडून शाळेतील विद्यार्थिनींना व गावकरी महिलांना सॅनिटरी नँपकीनचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन माध्यमिक शिक्षक अजय नरुले तर आभार प्रदर्शन लॉयन्स क्लबचे उपाध्यक्ष सतीश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक डी. सी. चिंचोलकर, श्री. ए.एम.हर्षे, श्री. योगेश गोंगल, अधीक्षक श्री. व्ही. एच. मडावी.यांनी प्रयत्न केले.