स्त्री हि सृष्टीचे जीवनचक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते : माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

56

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्त्री हि क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे. तिला आई, बहिण, मुलगी, पत्नी, मैत्रीण, मावशी, आजी इत्यादी अनेक नाती हळूवाळ जोपासावी लागतात. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कना स्त्री असते.स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही.आपले मुल संस्कारशील,अद्वितीय घडावे याकरिता जीवाचे रान करते. आजही स्त्री हि सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे शाखा गडचिरोलीच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्क्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून योगीताताई पिपरे बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नप सभापती वैष्णवी नैताम, बार्टी शिक्षिका धनश्री गावळकर, सचिन देशपांडे, सुरज लोणारे, मनेष नाकाडे, दिक्षा दरडे, विकास भुरले उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी नगराध्यक्ष पिपरे म्हणाल्या की, मूल पोटात वाढविन्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडविण्यापर्यंत जबाबदारी स्त्री विनातक्रार पार पाडते,त्यामुळे साने गुरुजी व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरुष घडले.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री ढाल बनते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले, यासारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले.आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगीतीपातावर आहे. गावच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे.
महिलांनी आजच्या आधुनिक युगात स्वतापासून बदल केले पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हि स्त्रीच्याच हातात आहे.महिला हि अखंड प्रेमाचे व प्रेरणेचे स्त्रोत असुन स्वता खंबीर राहून जिवनात येणाऱ्या संकटाचा जिद्दीने सामना करा.स्त्री शक्तीचा पुरेपुरवापर करून एक चांगली व्यक्ती,माणुस म्हणून बनुन दाखवा.असे महिलांना आवाहनही सौ. योगीताताई पिपरे यांनी केले आहे.
यावेळी आशुतोष मोटघरे, सुप्रिया भानारकर, भाग्यश्री, प्रबोधिनी, पौर्णिमा रावडे, श्रेया भैसारे यांनी जागतिक महिला दिनाविषयी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी उराडे तर आभार पल्लवी धनविजय हिने मानले.