प्राथमिक आरोग्य पथक पारडी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सभापती मारोतराव इचोडकर यांच्या हस्ते शुभारंभ

92

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला अंतर्गत एकूण अपेक्षित 2936 बालकांना 27 फेब्रुवारीला 47 बूथ, 3 ट्रांझिस्ट टीम, 2 मोबाईल टीम व 113 कर्मचारी यांच्या मदतीने पोलिओ डोज पाजण्यात आले. सदर पोलिओ लसीकरण बूथचे उद्घाटन सकाळी प्राथमिक आरोग्य पथक पारडी येथे पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर यांच्या हस्ते संकल्प वि. मून याला प्रथम पोलिओ डोज पाजून करण्यात आले. यावेळी प्रा. आ. पथक पारडीचेे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर मडावी, फार्मसी ऑफिसर विवेक मून, सौ. विद्या आकनूरवार, सौ. ग्रीष्मा मून, सौ. माधुरी दुमाने, श्रीमती नैताम हे प्रामुख्याने उपस्थित होते.