मार्कंडा यात्रेकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोफत बस सेवा

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून मार्कंडा यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाची साथ ओसरत चालल्याने प्रशासनाने मार्कंडा यात्रेकरिता परवानगी दिली. परंतु मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने मार्कंडा यात्रेकरिता येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली ते मार्कंडा 1 मार्चपासून यात्रा समाप्त होतपर्यंत मोफत बससेवा सुरु करण्यात येणार असून राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार तथा जेष्ठ नेते मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा जिल्हानिरीक्षक डॉ. नामदेवराव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, काँग्रेस जेष्ठ नेते माजी जि. प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेेलवार, निरीक्षक शिशिर वंजारी, शिवा राव, रवींद्र दरेकर, जेष्ठ नेते तथा जि. प. सदस्य अँड. रामभाऊ मेश्राम, हसनअली गिलानी, उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रा. राजेश कात्रटवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथून हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. तरी सदर बसेसचा उपयोग मोठ्या संख्येने मार्कंडा यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांनी घ्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जनतेला केले आहे.