युक्रेनमध्ये अडकलेल्या गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणा

314

– जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : रशियाने काही दिवसांपासून युक्रेन विरुद्ध युद्ध फुकारल्याने युक्रेनमध्ये सद्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणाकरिता गेले असता व सद्या स्थितीत विमानसेवा बंद झाल्या कारणाने अडकून पडले आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांच्या सुद्धा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ह्या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ स्वगृही सुखरूप परत आणावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव समशेखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, शहराध्यक्ष सतीश विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.