माजी आमदार डाॅ. नामदेवराव उसेंडी यांनी केला नवनियुक्ती नगरपंचायत उपाध्यक्ष, सभापती, स्विकृत सदस्यांचा सत्कार

96

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी स्थानिक नगरपंचायत समितीची सभा 21 फेब्रुुवारी 2022 ला आयोजित करण्यात आलेली होती. सभेमध्ये आरोग्य सभापतीपदी उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे व बांधकाम सभापतीपदी वैभव भिवापुरे, तथा पाणी पुरवठा सभापतीपदी सुमित तुरे यांची अविरोध निवड करण्यात आली होती. 22/2/2022 रोजी बांधकाम सभापतीपदी वैभव भिवापुरे, आरोग्य सभापतीपदी उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, पाणी पुरवठा सभापतीपदी सुमित तुरे, स्विकृत सदस्य आशिष पिपरे यांनी माजी आमदार तथा महासचिव महा. प्रदेश काॅग्रेस कमिटी डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी अविरोध निवड झालेले बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, आरोग्य सभापतीपदी उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, पाणी पुरवठा सभापतीपदी सुमित तुरे, स्विकृत सदस्य आशिष पिपरे यांचा माजी आमदार तथा महासचिव डाॅ. नामदेवराव उसेंडी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष काॅंग्रेस कमिटी प्रभाकर वासेकर, महासचिव दौलत धुर्वे, विनायक वाडीवा, शैलेश शहा, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पांडूरंग घोटेकर, रेहान शेख, राकेश आतला, पंकज खोबे आदी उपस्थित होते.