गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाकडे शासनाने लक्ष द्यावे : भाजपा जिल्हा सचिव संदीप राचर्लावार यांची मागणी

140

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यात असलेल्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने काही प्रमाणात का होईना प्रयत्न केले जात असले तरी वन विभाग व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास अद्यापही रखडलेला आहे. पर्यटनस्थळी कोणत्याही प्रकारच्या योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांनमधून नाराजिचा सूर उमटत चाललेला आहे. जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील टिपागड, भामरागड तालुक्यातील बिनागुंडा, सिरोंचा सारख्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड राज्यास लागून असलेल्या प्रसिद्ध सोमनूर संगम स्थळ, अहेरी तालुक्यातील वेंकटापूर व कमलापूर येथील हत्ती कॅम्प, चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध असे चपराळा अभयारण्याचा विकास अद्यापही कागदोपत्री झाल्याचे दिसून येत आहे. यास वन विभाग व प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे झालेला आहे. जिल्ह्यातील या पर्यटनस्थळमुळे राज्य शासनाला व प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकतो. यासोबतच स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारही मिळू शकतो. असे असतानाही मात्र स्थानिक मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचे या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने या कारणामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास होऊ शकलेला नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या बाबीकडे आतातरी गंभीर याने लक्ष देत जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव संदीप राचर्लावार यांनी शासन व प्रशासनास केली आहे. या पर्यटनस्थळाच्या माध्यमातून विकास झाल्यास जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देऊ शकतील. या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध होऊ शकेल. तसेच अनेकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांंचा विकास करण्यात यावा, असे मत भाजपा जिल्हा सचिव संदीप राचर्लावार यांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना संसर्ग कमी असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा स्थितीत राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळ बघण्यासाठी पर्यटक भेट देत आहे. मात्र येथे कोणत्याही प्रकारचे योग्य प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात न आल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना रोजच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या पर्यटनस्थळाच्या विकासाकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे झालेले आहे. या अगोदर चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी अनेक वेळा चामोर्शी येथील मार्कण्ड देवस्थानाला भेट देऊन पाहणी केली आहे व समस्या जाणून घेतलेले असून त्यांनी याबाबत केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे चामोशी तालुक्यातील मार्कंड देवस्थानाच्या विकासा बाबतीत पाठपुरावा केला असता सोबतच त्यांनी या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी सुद्धा केली होती व कामासाठी निधीची मागणी सुद्धा शासनाकडे केली असता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या चमूने नुकतीच भेट देऊन पाहणी करुन सदर प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केला असून या देवस्थानाला लवकरच विकास कामासाठी निधी उपलब्ध होणार आहे अशाप्रकारे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून या पर्यटनस्थळांना विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव संदीप राचर्लावार यांच्याकडून होत आहे