जातीधर्मात अडकून न पडता शिवरायांनी केले रयतेचे राज्य निर्माण :  माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी

107

– गट्टेगुळा (गिलगाव जमी) येथे शिवजयंती सोहळा उत्साहात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा – गिलगाव प.स. क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गट्टेगुळा येथे राजे शिवछत्रपती शिवाजी मोहत्सव कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. हनुमान मंदिराच्या परिसरात शिवजयंतीचा कार्यक्रम गावातील सर्व युवकांनी तसेच युवतींनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्नशील राहिले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, शिवरायांच्या विचारांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, संपूर्ण जगभरात देशात महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात त्यांच्या नामस्मरणाच्या जयघोषात जल्लोषात साजरी केली जाते. यांचे कार्य, त्यांची शिकवण, आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून प्रत्येकांनी त्यांचा आदर्श जोपासावे. छत्रपती हे शुरविर, पराक्रमी, बंधूभावाची शिकवण देणारे आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या कर्तबगार मावळयांना सोबत घेऊन गनिमी काव्याने शत्रूला नामोहरण करणारे रयतेचे राजे, छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यात कोणत्याही प्रकारचं भेदभाव न करता, शेतकरी कष्टकरी स्त्री – पुरुष सुखाने नांदत होती. अन्याय अत्याचार होत नव्हता. जातीभेद, धर्मभेद, दुजाभाव, असा अडकून न पडता रयतेचे राज्य शिवरायांनी निर्माण केले होते, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा महासचिव महा. प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेवराव उसेंडी, उपाध्यक्ष ग्रा. पं. गिलगाव सरपंच श्रीमती रेखाताई रामगोपाल आलाम प्रमुख अतिथी कोषाध्यक्ष काँग्रेस जि. कमिटी प्रभाकर वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनिल कोठारे, महासचिव काँ. क अशोक चलाख, उपसरपंच मनोज चापडे, सरपंच नवरगाव खुशाल कुकडे, ग्रा. पं. सदस्य शालुताई आलाम, ग्रा. पं. सदस्य नायनाताई कडाम, तं. मु. स.अध्यक्ष पांडुरंग मोगरकर, वनसमिती अध्यक्ष गोपाल भांडेकर, गुलाब मानापुरे, पंकज खोबे, अशोक कुनघाडकर, मंडळाचे अध्यक्ष नितेश भांडेकर, उपाध्यक्ष अजित कुनघाडकर, सचिव रोशन चापडे, सहसचिव रोशन मोगरकर, सदस्य विद्याधर वासेकर, रोहित कटवे, घनश्याम जुवारे, संदीप चिलंगे, अजय भांडेकर, योगाजी काटवे, कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता गावातील सर्व नागरिक, महिला, युवक, युवती यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मनोज चापडे यांनी केले. संचालन अनिकेत चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन नितेश भांडेकर यांनी केले.