क्रिकेट सोबतच इतरही खेळांवर युवकांनी लक्ष केंद्रित करावे : महेंद्र ब्राम्हणवाडे

111

– पारडी येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब पारडी यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले.
क्रिकेट हा फक्त करिअरचा माध्यम नसून ज्या खेळांच्या माध्यमातून करिअर बनवता येईल, अशा खेळांवर युवकांनी भर देऊन ऑलम्पिकमध्ये होणाऱ्या स्पर्धेची तयारी करावी सोबतच इतरही खेळांवर युवकांनी लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव किरसान मुख्य अतिथी म्हणून प्रदेश महासचिव डॉ. नितीन कोडवते, शहर काँग्रेस अध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेस जेष्ठ नेते दामोदर मंडलवार, घनश्याम मुरवतकर, हरबाजी मोरे. दत्तू सुत्रपवार, विवेक मून यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.