माजी नगराध्यक्षा डॉ. अश्विनीताई रामकिरित यादव यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा

81

नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिली भेटवस्तू

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 21 फेेब्रुवारी 2022 रोजी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. अश्विनी रामकिरित यादव यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. गोकुळनगर शाळेतील विद्यार्थ्यांना घड्याळ, बेशिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री आणि विसापूर शाळेतील विद्यार्थ्यांना घड्याळ वाटप करण्यात आले.

हे कार्य शिवसेना गडचिरोली शहर प्रमुख रामकिरित यादव यांच्यातर्फे डॉ. अश्विनी यादव यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे प्रथम समाजकार्य नंतर राजकारण असाच संदेश जणसामान्यात जाते. सातत्याने आपल्या हातून जनहितार्थ कार्य घडत राहावे, आपणास दिर्घ आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, शिवसेना गडचिरोली विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे, तां. प्र. गजानन नैताम, शहरप्रमुख रामकिरित यादव, अंकुश धात्रक, मंगलाताई धात्रक, वसुधाताई धात्रक, मस्के मँडम, बन्सोड, रामटेके, प्रत्येक शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि बाल विद्यार्थी उपस्थित होते.