आशीर्वाद सभागृह गोकुळनगर येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

85

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आशीर्वाद सभागृह गोकुळनगर गडचिरोली येथे शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली शहर अध्यक्ष विजयभाऊ गोरडवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पन करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गडचिरोली शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका सौ. मिनल चिमुरकर, माजी नगरसेविका संध्याताई ऊईके, जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नईम शेख, भास्कर निमजे, प्रल्हाद पवार, अमोल कुळमेथे, मल्लया कालवा, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गडचिरोली तालुका अध्यक्षा श्रीमती निताताई बोबाटे, राष्ट्रवादीचे तालुका चामोर्शी निरीक्षक आरती कोल्हे, सुंदराबाई गायकवाड, सपना मरस्कोल्हे, सौ. मिना डहाळे, सरिता कोकोडे, आशा मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.