चामोर्शी तालुक्यातील नरेगा अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व घरकूलचे अपूर्ण मस्टर व सर्व प्रलंबित कामे मार्चआधी पूर्ण करा : आमदार डॉ. देवराव होळी

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पंचायत समिती येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी नरेगा अंतर्गत कामांचा आढावा घेतला. यावेळी संवर्ग विकास अधिकारी मूरुगनंदम, सभापती डोरलीकर, विकास अधिकारी डुकरे, विस्तार अधिकारी काळबांधे, ए. पी. ओ नरेगा मेश्राम उपस्थित होते. उपस्थितांना आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले. आजच्या आढावा बैठकीत आमदार डॉ. होळी यांनी नरेगा कामांचा आढावा घेतला व पांदन
रस्त्यांचे नवीन नियमानुसार खडीकरण करण्यात यावे व आवश्यक तेथे मातीकाम सुरू करण्यात यावे आतापर्यंत 150 पैकी 130 ग्रामपंचायतने स्वामित्वचे काम पूर्ण केले आहे. गावनिहाय ड्रोन सर्व्हे करताना ग्रामपंचायत कमेटी व ग्राम सचिव यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून ड्रोण सर्व्हे करून घ्यावे, असे आवाहन केले व मार्च महिन्यापर्यंत समस्त नरेगा अंतर्गत विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.
आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या
सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील नरेगाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.