गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायती काँग्रेसमय

112

– धानोरा, चामोर्शी, एटापल्लीत काँग्रेसचा झेंडा तर कुरखेड्यात काँग्रेस- शिवसेना युतीची सत्ता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीपैकी पाच नगरपंचातीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक 14 फेब्रुवारी रोजी पार पडली असून धानोरा, चामोर्शी, एटापल्ली नगरपंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तर कुरखेडा नगरपंचायतमध्ये काँग्रेस-शिवसेना युतीचे नगराध्यक्ष झाले आहे. धानोरा नगरपंचायतीत नगराध्यक्ष म्हणून पौर्णिमा भास्कर सयाम, चामोर्शीत नगराध्यक्ष म्हणून जयश्री वायलालवार, एटापल्लीत नगराध्यक्ष म्हणून दिपयंती निजान पेंदाम आणि कुरखेडा नगरपंचायतमध्ये अनिता बोरकर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झालेली असून काँगेसमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन जिल्हा सद्या काँग्रेसमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या सम्पूर्ण यशाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा आंनद द्विगुणित झाला असून येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुुकीत देखील काँग्रेस कार्यकर्ते अधिक ताकतीने व आत्मविश्वासाने कामाला लागतील व पक्षाला भरगोस यश मिळवून देतील, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केला आहे.