सिरोंचा नगरपंचायतवर आदिवासी विद्यार्थी संघाने केली एकहाती सत्ता हस्तगत

66

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिरोंचा नगरपंचायतवर आदिवासी विद्यार्थी संघाने एकहाती सत्ता हस्तगत केली आहे. सिरोंचा नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नगरपंचायत सभागृहात निवडणूक पार पडली. यात आविसंचे शेख फरजाना अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून शेख बबलू पाशा बहुमताने निवडून आले. सिरोंचा नगरपंचायतमध्ये 17 जागांपैकी 10 जागांवर आविसंचे नगरसेवक निवडून आले होते. काल पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर आविसंने एकहाती बाजी मारल्याने आविसं पदाधिकाऱ्याांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा केले.