युवक व विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात कसरत करून स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ सुदृढ करावे : मधुकरजी भांडेकर

243

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मोबाईल खेळला महत्त्व न देता युवक व विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात कसरत करावी आणि स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ सुदृढ करावे, असे प्रतिपादन भाजपा गडचिरोली जिल्हा युवा मोर्चा महामंत्री मधुकरजी भांडेकर यांनी केले.

चामोर्शी तालुक्यातील रेखेगाव येथे विर शिवाजी क्रिकेट क्लब आमगाव चक 1 जानाळा (तु.) यांच्या वतीने 15 फेब्रुवारी रोजी अंडर्म आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तेे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाडभिडी (बी.) येथील सरपंच सौ. गाडवे तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. ज्योत्स्नाताई गव्हारे, सरपंच आमगाव महाल, एकनाथ भुरसे, रमेशजी नरोटे, सोमनाथ पिपरे, सुरेंद्र सोमनकार मा. पं. समिती सदस्य आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.