एटापल्ली भाजपा तालुकाध्यक्षपदी विजय नल्लावार यांची नियुक्ती

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली भाजपा तालुकाध्यक्ष पदावर विजय नल्लावार यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केली आहे. विजय नल्लावार गेल्या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत.

विजय नल्लावार यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे. खासदार अशोक नेते. माजी मंत्री अंबरीशराव महाराज, भाजपा नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा जिल्हा महामंत्री रवी ओल्लालवार यांना दिले आहे.