विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येथील कन्नमवार नगरस्थित राधाकृष्ण महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या अध्यक्ष रजनी अर्जुनकर यांच्या हस्ते गणराज्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव कमल सातपैसे, सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक कराेडकर, अभिकर्ता माधुरी दहेलकर, शुभांगी बोरकुटे, आशा बांबाेळे, साेनाली कुंटेवार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल राेहनकर, व्यवस्थापक पितांबर बोरकुटे, अभिकर्ते राघवेंद्र तिवारी, मनोहर जेंगठे, राजू कोठारे, गुरुदास बांबोळे आदींसह पतसंस्थेचे अभिकर्ते, सभासद व खातेदार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे कर्मचारी अरविंद मुनघाटे, मीनल विरवार, जयश्री बांगरे, नलिना परचाके आदींनी सहकार्य केले.