गावातील युवकांनी ग्रामविकासाकरिता सुध्दा असाच पुढाकार घ्यावा : आमदार डॉ. देवराव होळी

98

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मंजेगाव येथे किंग कोब्रा क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने 1 फेब्रुवारी 2022 रोजी रात्रकालीन अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती मीनाताई कोडाप, सरपंच रेखाताई कोहपरे, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, उपसरपंच मनोज येलमुले, ग्राम सचिव भारत सरपे, ज्येष्ठ नेते विठ्ठल बोमकंठीवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना आमदार डॉ. देवराव होळी, मीनाताई कोडाप यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार डॉ. होळी यांनी मार्गदर्शन भाषणात सांगितले, ज्याप्रमाणे सदर अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट सामने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला त्याचप्रमाणे समस्त मंजेगाव येथील युवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. होळी यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी किंग कोब्रा क्रिकेट क्लब अध्यक्ष जयंद्र तुंकलवार, उपाध्यक्ष पंकज लेकलवार, सचिव रणजित चौधरी, क्रीडा प्रमुख धनराज मेकलवार, पुरुषोत्तम कटकेलवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.