पोटेगाव आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

78

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी ध्वजसंचालन केले. मानवंदना क्रीडा शिक्षिका प्रीती क्षिरसागर यांनी दिली. कार्यक्रमाला समग्र शिक्षा अभियान समिती अध्यक्ष सुकरू उसेंडी, माध्यमिक शिक्षक डॉ. एस. डी. गोट्टमवार, प्रमिला दहागावकर, के. पी. मेश्राम, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, जेष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसु, व्ही. एम. नैताम, एन. पी. नेवारे, अधीक्षक एस. आर. जाधव, अधीक्षिका एल. आर. शंभरकर, कला शिक्षक प्रमोद पवार, संगणक शिक्षक रजत बारई, व्ही. के. नैताम, प्रशांत बोधे, विनोद बेहरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.