गोकुळनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

63

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक गोकुळनगर वॉर्ड क्र. 23 येथील हनुमान मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही 73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. येथील ध्वजारोहण नगर परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय गोरडवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मिनल चिमूरकर, वॉर्डातील प्रतिष्ठीत नागरिक भास्कर निमजे, युवा कार्यकर्ते अमोल कुळमेथे, अशोक आक्केवार, सदाशिव नैताम, निता बोबाटे, पुष्पा करकाडे, पुरुषोत्तम कुळमेथे, प्रकाश कम्पलवार, मुख्याध्यापिका म्हस्के, सहायक शिक्षक रामटेके तथा गोकुळनगर प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका खोब्रागडे, बारसागडे, मदतनिस, आशा वर्कर आदींची उपस्थिती होती.