अपघातात आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी

68

– रनमोचन फाट्याजवळ कारची ट्रॅक्टरला जोरदार धडक

विदर्भ न्यूज क्रांती

गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतुल गण्यारपवार हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सोबती असलेले भाजपा नेेते आनंद गण्यारपवार हे अपघातात जागीच ठार झाले.
काल गुरुवारी सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरीमार्गे नागपूरला जात असताना ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई गावाजवळील रनमोचन फाट्याजवळ कार क्रमांक MH 33 v 245 ने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात कारमधील आनंद गण्यारपवार जागीच ठार झाले तर अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने ट्रॅक्टरच्या इंजिनचे मधातून दोन तुकडे झाले. आनंद गण्यारपवार हे जागीच गतप्राण झाले असून अतुल गण्यारपवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.