– एक आठवड्याच्या आत मानधन न मिळाल्यास जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा इशारा
– थकीत मानधन व पुनर्नियुक्ती ऑर्डर मिळवून देण्याची महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्याकडे कोविड योध्यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : थकीत मानधन लवकरात लवकर मिळवून देण्याकरिता शुभम मेश्राम यांच्या शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्याकडे मागणी केली. कोविड काळात यापैकी अनेकांनी मायक्रोबायोलाजिस्ट, टेक्निशीयन, असिस्टंट, अटेंडेंट, वॉर्ड बॉय म्हणून या योध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न करून कोविड रुग्णालयात सेवा दिली. परंतु मागील सहा महिन्यांपासून यांना मानधन मिळाले नसून माहे जानेवारी ते जुलै २०२२ चे पुनर्नियुक्ती आर्डर सुद्धा अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केले असता अद्यापही यावर कार्यवाही झालेली नाही असे उपस्थित शिष्टमंडळाने सांगितले असून, कोविड योध्यांचा सन्मान करणे हे आमचे पहिले कर्तव्य असून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याकरिता शासन दरबारी सर्वोतपरी प्रयत्न करणार व लवकरात लवकर थकीत मानधन मिळवून देणार, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. यावेळी शुभम मेश्राम, मृणाली लोयबरे, करिष्मा हर्षे, स्नेहा भजभुजे, पल्लवी दहागावकर, पल्लवी वासेकर, पूनम आत्राम, किरण कुते, पायल राहुलकर, अस्मिता डोंगे, पायल कोडापे, योगिता कोटरंगे, भाग्यश्री मेश्राम, प्रफुल राऊत, अंकुश डोंगरे, दीक्षा दर्डे, चांदणी गेडाम, प्रीती सरकार, आशिष कुनघाडकर, आशिष कुकडे, अविनाश गव्हारे, विठ्ठल सोनटक्के, सुरज रामटेके यांच्यासह अनेक कंत्राटी कामगार उपस्थित होते.