प्रधानमंञी आवास योजनेचे उर्वरित हप्ते तत्काळ देण्यात यावेत : आमदार कृष्णा गजबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

92

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : उद्योगविरहित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधीच येथील नागरीक हलाखीचे जीवन जगत असताना शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या प्रधानमंञी आवास योजनेचे हप्तेही थकविण्यात आल्याने संबंधित लाभार्थी एकुणच अडचणीत आल्यामुळे या योजनेतील प्रलंबित हप्त्यांचा आढावा घेऊन लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनाातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंञी आवास योजना शहरी व ग्रामीण अंतग॔त लाभार्थ्यांना घरकूल मंजुर करण्यात आले आहे. प्राप्त मंजुरीच्या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांनी पहिल्या व दुस-या टप्प्यातील बांधकाम पुर्ण केले आहे. माञ त्यांना अद्यापही अनुदान अप्राप्त असल्याने सदर लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनेकांनी राहते झोपडीवजा घर उधळल्याने उघड्यावर संसार थाटले आहे. घरकुलाचे बांधकाम अपुर्ण असल्याने वास्तव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना बांधकामावरील मजुर, बांधकाम साहित्य पुरवठादार हे त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावत असल्याने योजनेच्या लाभार्थ्यांना शारीरिक व मानसिक ञासाला सामोरे जावे लागत आहे. असे असताना संबंधित लाभार्थ्यांना अद्यापही संबंधित घरकुल योजनेचे उर्वरित हप्ते देण्यात न आल्याने एकुणच लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता उर्वरित हप्ते तत्काळ देण्याची मागणी आमदार गजबे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे संबंधित लाभार्थ्यांचे लक्ष लागुन आहे.