गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 9 नगरपंचायतीचे निकाल जाहीर

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 9 नगरपंचायतीचे निकाल जाहीर 20 जानेवारी रोजी जाहीर झाला. यात सर्वाधिक 39 जागांंवर काँग्रेस पक्षाने विजय मिळविला तर भाजपा 36, राष्ट्रवादी काँग्रेस 27, शिवसेना 14, आदिवासी विद्यार्थी संघाने 22 जागा जिंकल्या तर अन्य 14 जागांंवर विजयी झाले आहेत. नऊ नगरपंचायतीमधील 153 जागांंसाठी 607 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या भाग्याचा फैसला लागला आहे.

चामोर्शी नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 60 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टी पक्षाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 उमेदवार तर 1      अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. मुलचेरा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 49 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 1 उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना पक्षाचे 4 उमेदवार तर 6 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत. धानोरा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 54 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 13 उमेदवार निवडून आले तर 1अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. कुरखेडा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 69 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 9 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. तर 5 उमेदवार शिवसेना पक्षाचे निवडून आले आहेत. कोरची नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 68 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे 6 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 उमेदवार विजयी झाले आहेत. तर 2 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत. अहेरी नगरपंचायतीतील 17 जागांंवर 83 उमेदवार उभे होते. यापैकी भारतीय जनता पार्टी मधील 6 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार, शिवसेना येथील 2 उमेदवार व 6 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. सिरोंचा नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 80 उमेदवार उभे होते. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे 5 उमेदवार विजयी झाले. तर शिवसेना येथील 2 उमेदवार विजयी झाले. व 10 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत. एटापल्ली नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 82 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार तर 6 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत. भामरागड नगरपंचायतीतील 17 जागांसाठी 62 उमेदवार उभे होते. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे 5 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार, शिवसेना 1 तर 6 उमेदवार अपक्ष निवडून आले आहेत.