नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मिळविला 21 जागांवर कब्जा

83

– शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव यांची माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात शिवसेनेने संमिश्र यश प्राप्त केले आहे. या निवडणुकीत 153 जागांपैकी 21 जागांवर कब्जा मिळविला असल्याची माहिती शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी दिली. नगरपंचायतींच्या निवडणुकीत कुरखेडा व चामोर्शी या दोन ठिकाणी काॅंग्रेसशी आघाडी केली होती. अन्य ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. यापैकी अहेरी 2, सिरोंचा 2, भामरागड 1, मुलचेरा 4, कुरखेडा 5 अशा एकूण 14 जागा अधिकृत चिन्हावर लढवून मिळविल्या. तर मुलचेरा येथील 2 अपक्ष, एटापल्ली येथील 2, अहेरी येथील 1 व भामरागड येथील 2 अशा एकूण 7 जागांवर निवडून आलेले अपक्ष शिवसेना समर्थित आहेत. त्यामुळे एकूण 21 जागांवर शिवसेनेचा कब्जा असल्याचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी सांगितले आहे.
दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश
यावेळी मुलचेरा येथील मोहना परचाके व विजय कुळमेथे या दोन अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी दोघांनाही शिवबंधन व दुपट्टा परिधान करून त्यांचे पक्षात स्वागत केले. तसेच अन्य काही कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे मुलचेरा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.