भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या : खासदार अशोक नेते

104

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक तीन येथे भाजपा उमेदवार सोनाली आशिष पिपरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ नागरिकांना जाहीर आवाहन करताना खासदार अशोक नेते बोलत होते. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचेे आमदार डॉ. देवराव होळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा योगिताताई भांडेकर, गडचिरोलीचे भाजपा नगरसेवक रमेश भुरसे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष पिपरे, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, युवा नेते प्रतीक राठी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.