नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे व विकासाचे प्रश्न मार्गी लावणे हेच काँग्रेस पक्षाचे ध्येय : महेंद्र ब्राम्हणवाडे

99

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक 3, 8 व 10 मध्ये काँग्रेसची प्रचार सभा पार पडली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेराव किरसान, प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी, ता. अध्यक्ष विनोद खोबे, काँग्रेस नेते नितीन वायललवार, सुमेध तुरे, राजेश ठाकूर पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभव भिवापुरे, सुरेखा नैताम, स्नेहा सातपुते सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे व विकासाचे प्रश्न मार्गी लावणे हेच काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे. काँग्रेस हा जनसामान्यांच्या हिताचा विचार करणारा पक्ष असून आजतागायत पक्षाने गोर गरीब जनतेला केंद्रभागी ठेवून धोरण निश्चिती केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित जनतेला केले.