गडचिरोली नगर परिषदेचा सन २०२२-२३ चा शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेची शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, १४ जानेवारी रोजी नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये पार पडली. सभेमध्ये नगर परिषद महसूल विभाग व शासकीय अनुदान निधीचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला.
यामध्ये नगर परिषद महसूल विभागाचा ३१ कोटी, २ लक्ष, ५९ हजार, ६३ रुपयांची महसूल रक्कम जमा होणार असून ३० कोटी, ९७ लक्ष, ७५ हजार रुपये एवढी रक्कम खर्च होणार आहे. तर ४ लक्ष, ८४ हजार ६३ रुपये एवढी रक्कम शिल्लक राहणार आहे. शासकीय अनुदान निधीमधून १२३ कोटी, ४० लक्ष, ७९ हजार रुपये एवढी रक्कम जमा होणार असून ११५ कोटी, ९८ हजार रुपये खर्च होणार आहेत. उर्वरीत ७ कोटी, ४२ लक्ष, ७९ हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक राहणार आहे.
या पाच वर्षांमध्ये गडचिरोली शहरात बरेचसे विकास कामे झालेली असून आजच्या अंदाजपत्रकामुळे गडचिरोली शहराच्या विकास कामांवर भर पडणार आहे.
सभेला उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, शिक्षण सभापती वर्षा नैताम, नगरसेवक केशव निंबोड, नगरसेविका रितु कोलते उपस्थित होते.
न. प. लेखापाल स्नेहल सेन्द्रे यांनी सन २०२२-२३ चा शिल्लकी अंदाजपत्रक व जमा-खर्च मांडला. यावेळी स्थायी समितीने सर्वानुमते मंजूर केला.