जवाहर वार्ड येथील जुनी वडसा मस्जिदच्या मालमत्तेवरील भवनाचे बांधकाम त्वरित चालू करा : समाजवादी पक्षाच्या वतीने आमदार गजबे यांना निवेदन

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जवाहर वार्ड देसाईगंज येथील जुनी वडसा मस्जिद कमेटीच्या नगर परिषद मालमत्ता क्रमांक 159 या ठिकाणी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या विकास निधीतून जुनी इमारत पाडून भवन निर्माण करिता निधी देण्यात आला. मात्र एप्रिल महिन्यात सदर जुनी इमारत पाडून सपाट करण्यात आली. परंतु आतापर्यन्त नऊ महिने लोटूनही सदर जागेत भवन बांधकामाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. या ठिकाणी आपण दिलेले आश्वासन पूर्ण करत लवकरात लवकर बांधकामास सुरुवात करावे या मागणीला घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांंना समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इलियास खान, जुनी वडसा मस्जिद कमेटी अध्यक्ष आमीर यासिणी, जुनी वडसा मस्जिद कमेटी सदस्य जाफर शेख, जुनी वडसा मस्जिद कमेटी सदस्य रिजवान बेग, जुनी वडसा मस्जिद कमेटी सदस्य शाहीद पटेल, फारुख शेख, सद्दाम अन्सारी, जुनी वडसा मस्जिद कमेटी सदस्य जमील शेख, जीब्राइल शेख समाजवादी पार्टी, अफसर शेख आदी उपस्थित होते.