गडचिरोली येथे जिल्हा जलसंधारण कार्यालय तातडीने सुरु करण्यात यावा : आमदार कृष्णाजी गजबे

69

– राज्याचे मृद व जलसंधारण मंञी यांच्याकडे केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विभागाच्या क्षेञीय संरचनेमध्ये कामकाज करताना अनेक प्रशासकीय अडचणी उद्भवू लागल्यामुळे शासनाच्या संदर्भिय निर्णयातील विवरणपञ-ड नुसार गडचिरोली येथे जिल्हा जलसंधारण कार्यालय तातडीने सुरु करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंञी ना. शंकरराव गडाख यांना दिलेल्या पञातूून केली आहे.
दिलेल्या पञात त्यांनी म्हटले आहे की, मुख्य अभियंता, विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम नागपुर हे कार्यालय १३ मार्च २०१७ पर्यंत ५ वर्षाची मुदत संपुष्टात आल्यामुळे बंद झाले आहे. परिणामी विभागाच्या क्षेञीय संरचनेमध्ये कामकाज करताना अनेक प्रशासकीय अडचणी उद्भवू लागल्यामुळे १ मार्च २०१९ च्या संदर्भिय शासन निर्णयातील विवरणपञ-ड नुसार गडचिरोली येथे नविन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय निर्माण करुन कार्यालया करीता जलसंधारण अधिका-यासह एकुण १६ पदे मंजुर करण्यात आली आहेत. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीअभावी आदिवासीबहुल नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अतिसंवेदनशील जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागाद्वारे राबविण्यात येणारे प्रकल्प रखडले असल्याने जलसिंचन योजनेपासुन जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना वंचित राहावे लागले आहे. विभागाद्वारे राबविण्यात येत असलेली नदी पुनरुज्जीवन व अन्य जलसंधारणाची कामे पुर्णत: ठप्प पडलेली असुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडुनही जलसंधारणाच्या कामांअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामास वाव असुन सदर कामे जलदगतीने पुर्ण केल्यास पावसाचे वाहुन जाणारे पाणी अडवून जिल्ह्यात निर्माण होणा-या दुष्काळी परिस्थितीवर मात करुन जिल्हा सुजलाम- सुफलाम होण्यास निश्चितच मदत होईल. याकरिता संदर्भिय शासन निर्णयानुसार मंजुर असलेले गडचिरोली येथील नविन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालय पुर्ण क्षमतेने तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार गजबे यांनी मृद व जलसंधारण मंञी ना. शंकरराव गडाख यांना दिलेल्या लेखी पञातुन केली आहे.

कार्यालयाकरिता रिक्त असलेली मंजूर पदे
दरम्यान, कार्यालयाकरिता रिक्त असलेली १६ पदे यात एक जिल्हा जलसंधारण अधिकारी, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी, चार शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-२, एक लेखाधिकारी वर्ग-२, एक कार्यालयीन अधिक्षक, एक वरिष्ठ लिपिक, तीन कनिष्ठ लिपीक असे एकुण नियमीत १२ पदे व एक वाहन चालक व तीन परिचर अशा एकुण १६ पदांचा समावेश असून ही पदे तातडीने भरुन कार्यालय सुरु करण्याची मागणी आमदार गजबे यांनी केली आहे.