पोटेगाव आश्रमशाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका, महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व संविधान सभेचे सदस्य जयपाल सिंह मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षिका एल. आर. शंभरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर, ज्येष्ठ मध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, प्रमिला दहागावकर, के. पी. मेश्राम, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, जेष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसु, व्ही. एम. नैताम, एन. पी. नेवारे, अधीक्षक एस. आर. जाधव, क्रीडा शिक्षिका प्रीती क्षिरसागर, कला शिक्षक प्रमोद पवार, संगणक शिक्षक रजत बारई आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या भाषणासह मनीषा पोटावी, रिना नरोटे, सुश्मिता वड्डे, काजल गावडे, आरती पुडो, वच्छला कुमरे, सोनाली पोटावी, करीना नरोटे, रनीता कुमरे, आर्यन गेडाम, रोहित पोटावी या विद्यार्थ्यांचे भाषणे झाली.
कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता 10, 9 व 8 वी च्या विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी गौरवगीत सादर केले. त्याचप्रमाणे इयत्ता 6 वी ची विद्यार्थिनी आरुषी वड्डे व प्रीती वड्डे हिने नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर शेंडे यानी केले. संचालन विद्यार्थीनी शिवानी पोटावी तर आभार प्रदर्शन वनश्री कुमरे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व्ही. के. नैताम, प्रशांत बोधे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.