गडचिरोली ऑल मीडिया असोशिएशनतर्फे पत्रकार दिन साजरा

127

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली ऑल मीडिया असोशिएशनच्या वतीने आज पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर यांच्या हस्ते ‘दर्पण’कार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार सर्वश्री जयंत निमगडे, मनिष कासर्लावार, व्यंकटेश दुडमवार, अनिल बोदलकर, उदय धकाते, मुक्तेश्वर म्हशाखेत्री, राजू सहारे, जगदीश कन्नाके, रुपाली शेरकी, संतोष सुरपाम उपस्थित होते.