Home गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी येथील शाळेत नवीन वसतिगृहाचे...

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी येथील शाळेत नवीन वसतिगृहाचे उद्घाटन

150

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत कस्तुरबा बालिका विधालय इंदाराम स्थित अहेरी, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभिनय अंतर्गत अहेरी येथील मॉडेल शाळा अहेरी येथे सुरू असून इंग्लीश मीडियमची शाळा आहे. या शाळेत शिकणारे बाहेरील विद्यार्थ्यांना व वर्ग 9 वी ते 12 वी शिकणारे विद्यार्थ्यांना या शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेता येणार आहे. सदर वसतिगृहाचेे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम सावित्रीबाईं फुले यांच्या जन्मदिनानिमित्ताने सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधीवत पूजा करणयात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती गीताताई चालुरकर, जि. प. सदस्य संजय चरडुके, इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कोडापे, सलीम शेख मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन योगीता नैताम यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक रोहनकर, डी. वाय. ढवस, मेघा बंडावार, बेडेकर, इतर  शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!