– भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने गिरनार चौक येथील जनसंपर्क कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की, सरदार वल्लभभाई पटेल आधुनिक भारताचे शिल्पकार असून त्यांनी भारतातील ५६२ संस्थांंने भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारताची राष्ट्रीय एकता व अखंडता अबाधित ठेवली ही आपल्या भारतीयांसाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर अभिवादन कार्यक्रमात महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, उपमहपौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, गटनेत्या जयश्री जुमडे, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ. दीपक भट्टाचार्य, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, रवी लोणकर, महानगर सचिव रामकुमार अक्कपेल्लीवार, चांदभाई पाशा, महामंत्री मनोरंजन रॉय, देवा बुरडकर, महिला मोर्चा महामंत्री शिला चव्हाण, नगरसेविका कल्पना बगुलकर, उपाध्यक्षा प्रभा गुडधे, लिलावती रविदास, रेणुका घोडेस्वार, सचिव मोनिषा महातव, कविता जाधव, महेंद्र जुमडे, उमेश आस्टनकर, पारितोष मिस्त्री, आशुतोष मंडल, रमेश भुते, सत्यम गाणार, अक्षय शेंडे, वासुदेव बेले, सचिन यामावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.