– नगरपंचायत चामोर्शी येथे प्रचार वाहनांना हिरवी झेंडी दाखवून प्रचाराचा केला शुभारंभ
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून विकास हेच ध्येय असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण आपले मत देऊन विजयी करावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी उमेदवारांच्या प्रचार वाहनांना हिरवी झेंडी दाखवून प्रचाराचा शुभारंभ करताना केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून नगरपंचायत चामोर्शी येथील उमेदवारांच्या प्रचाराच्या रथाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रचाराचा शुभारंभ केला. विकासाला महत्त्व देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनाच आपण मतदान करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी चामोर्शी नगरवासियांना केले.