अनखोडा येथील नाट्यप्रयोगाचे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते उद्घाटन

86

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वक्रतुंड क्रीडा व कला मंडळ अनखोडाच्या वतीने नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विश्वजीत कोवासे, अतुल येलमुले, संजय पंदिलवार, नितेश राठोड, गौरव येनप्रेद्दीवार, सरपंच अनखोडा रेखाताई येलमुले, पं. स. सदस्य शिवराम कोसरे, दिवाकर कुंदोजवार, जितेंद्र हुलके, कुणाल ताजणे यांच्यासह अनेक मान्यवर व नाट्यरसिक व श्रोते उपस्थित होते.