विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : स्थानिक शहरातील शुभाष वार्ड येथील पाणी टाकीचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जलशुद्धीकरण केंद्र आठवडी बाजार बोरमोळा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचेे खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष योगीताताई पिपरे राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, शिक्षण सभापती वर्षा नैताम, नगरसेविका वैष्णवी नैताम तसेच माजी सभापती व सर्व नगरसेवक/नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचेे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले आहे.