गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

75

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळविण्यासाठी व आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण 9 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम एकलव्य धाम गडचिरोली येथे पार पाडण्यात आला. सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण 9 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर २०२१ पर्यंत एकुण ३०दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण ५०० युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने लोअर, टी-शर्ट, शुज, लेखी परीक्षेकरिता आवश्यक अभ्यासक्रमांची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरित करण्यात आले. निरोप समारंभ कार्यक्रमास पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले १६९ युवती उमेदवार हजर होते. यावेळी उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त करून गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अमोल ठाकुर व उपविभागीय पोलीस अधिकारी (गडचिरोली) प्रणिल गिल्डा उपस्थित होते.गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या सहकार्याने ब्युटीपॉर्लर- ७० मत्स्यपालन- ६०, कुक्कुटपालन- २९३, शेळीपालन- ६७, लेडीज टेलर- ३५, फोटोग्रॉफी- ३५,मधुमक्षिका पालन- ३२, भाजीपाला लागवड- १९० तसेच टु व्हिलर व फोर व्हीलर ड्रायव्हिंg प्रशिक्षण- १०० अशा एकुण ८८२ युवक-युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.