आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा वाढदिवसानिमित्त ग्रामसेवकांनी केला सत्कार

104

– शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा वाढदिवसानिमित्त पंचायत समिती गडचिरोली येथे 10 डिसेंबर रोजी ग्रामसेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामसेवक अविश्वर बनपूरकर, पुरुषोत्तम बनपूरकर, जीवनदास ठाकरे, मंगल डाखरे, मोटघरे, कैलास कुलसंगे, वासंती देशमुख, श्रीमती नैताम, श्रीमती कवडो आदींची उपस्थिती होती.