आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा वाढदिवसानिमित्त पंचायत समिती गडचिरोली येथे सत्कार

86

– केक कापून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती गडचिरोलीच्या वतीने 10 डिसेंबर रोजी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी मोहर यांनी शाल व श्रीफळ देऊन आमदार डॉ. देेेवरावजी होळी यांचा सत्कार केला. त्यानंतर केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे, भाजपा तालुका महामंंत्री हेमंत बोरकुटे, पंचायत समितीचे सदस्य, तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच व कर्मचारी, विविध संघटनांचे प्रमुख यांनीही आमदार महोदयांचा सत्कार केला.