नाट्यकला मंडळ जोपासतो लोकसंस्कृतीचा वसा : महेंद्र ब्राम्हणवाडे

91

– पारडी येथील नाटकाचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आधुनिकतेच्या काळात लोप होत चालेल्या लोककला जोपासण्याचा काम नाट्य कला मंडळे करत असून त्यांचा काम प्रशंसनीय आहे. यातून स्थानिक कलाकारांच्या कला गुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. पारडी येथील नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. नाटकाचे उद्घाटन विवेक मून यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राजाभाऊ भोयर, योगेश कुंभारे, घनश्याम मुर्वतकर, गुरुदेव मोहूर्ले, गौरव एनप्रड्डीवार, विपुल एलट्टीवार आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नाट्य रसिक, श्रोते ठिकाणी उपस्थित होते.