क्रीडा क्षेत्रातून व्यक्तिमत्त्व विकास होतो : महेंद्र ब्राम्हणवाडे

77

– धुंडेशिवणी येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री दत्त कबड्डी क्लब धुंडेशिवणी यांच्या वतीने धुंडेशिवनी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले असून क्रीडाक्षेत्र व खेळांच्या माध्यमातून जिद्द, चिकाटी येते आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि ह्या सर्व गुणांचा अभ्यासात व सामान्य जीवनात फायदा होतो त्यामुळे युवकांनी नियमित काही वेळ खेळण्याकरिता दिला पाहिजे, असे प्रतिपादन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले व उपस्थित कबड्डी चमूंना पुढली सामान्याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण सावसागडे, जिल्हा संयोजक आम आदमी पार्टी, सहउद्घाटक म्हणून श्रीमती कल्याणी चौधरी मुख्याध्यापिका जि. प.शाळा तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जितेंद्र दोडके, मेघराज राऊत, जितेंद्र ठाकरे, सरपंच भावनताई फुलझेले, उपसरपंच प्रीतीताई गेडाम, मा.उपसरपंच सुरेंद्र राऊत आदी उपस्थित होते. सम्पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष दीपक राऊत, उपाध्यक्ष मिथुन दोडके, सचिव पंकज राऊत, सहसचिव अजय मडावी, कोषाध्यक्ष अंकुश रंधये, क्रीडाप्रमुख रोशन राऊत उपक्रीडाप्रमुख मोहीत राऊत आणि संपूर्ण पदाधिकार्यानी मिळून केले.