– मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरात विविध समस्या प्रलंबित आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निराकरण करा अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिवॲ ड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी दिला आहे.
26 जून 2024 रोजी नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी यांच्याकडे गडचिरोली शहरातील विविध समस्यांबाबत ॲड. कोवासे यांनी निवेदन दिले आहे.
मागील तीन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रसह गडचिरोली नगर पालिकेमध्ये सुद्धा प्रशासन कार्यरत आहे. मागील वर्षभरापासून शहरातील नालीसफाईचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे दिसून येत आहे. नाली सफाईकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे हे यावरून स्पष्ट होते. मागील तीन वर्षापासून पालिका प्रशासनाने नाली सफाईची निविदा न काढता हेतू परस्पर जुन्यास कंत्राटदाराला मुदतवाढ दिलेली आहे. तरी तत्काळ नवीन निविदा काढाव्या व शहरातील नागरिकांवर होत असलेला अन्याय दूर करावा, संपूर्ण शहरात फवारणी करण्यात यावी, भूमिगत गटार योजनेचे काम नगरपालिकेतर्फे करण्यात आले. सदर काम करीत असताना कंत्राटदाराने शहरातील रस्त्यावरील पाच चेंबर उंचावर घेतल्यामुळे बरेचसे अपघात होत असतात व घरगुती चारचाकी वाहनाचे चेंबर फुटलेले आहे. तरी सदर कंत्राटदाराला रोडचे काम योग्य पद्धतीने करण्याचे आदेश प्रदान करावे, अशीही मागणी कोवासे यांनी निवेदनातून केली आहे.
शहरातील जनतेला दोन वेळा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात येत असलेल्या बहुसंख्य वार्डातील पथदिवे बंद आहेत ते पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, स्मशानभूमी मध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, भूमिगत गटार लाईन चेंबरचे सर्वे करण्यात यावे, घर टॅक्स कमी करण्यात यावे, वीर बाबुराव शेडमाके चौक ते पोटेगाव बायपास रोडला जोडणारा 1800 मीटरच्या डीपी रोडचे काम भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे. तरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर त्वरित मुरूम टाकण्यात यावे अशा विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
गडचिरोली नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी येत्या सात दिवसात या सर्व मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेस महासचिव कुणाल पेंदोरकर, दत्तात्रय खरवडे प्रमोद वैद्य, कमलेश खोब्रागडे, युवक काँग्रेसचे अतुल मल्लेरवार, सुरेश भांडेकर, रमेश चौधरी, नंदु वाईलकर, समीर ताजने, संजय चन्ने, युवक काँग्रेसचे नितेश राठोड, माजीद सय्यद, लताताई मुरकुटे, गौतमा गेडाम, गीतांजली सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, मधुकर नाईक, प्रफुल आंबोरकर, जावेद खान, अजय भांडेकर, प्रभाकर वासेकर, गुलाबराव मडावी, सुनील डोगरा, विवेक घोंगडे, नगरसेवक संजय मेश्राम, जावेद शेख, सर्वेश पोपट, हेमंत मोहितकर, कल्पक मुप्पीडवार, कुणाल ताजने, टया खान उपस्थित होते.