महामंडळाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाने शेतक-यांच्या हिताची जपणूक होण्याची गरज : सहकारमहर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार

20

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळ पूर्वी आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी शेतकरी यांचा उत्पादनाला बाजारपेठ मिळावी,मालाला आधारभूत भाव मिळावा याकरिता आविका संस्थामार्फत खरेदी प्रक्रिया राबवित होती. मात्र आता यापूढे जात महामंडळाद्वारे शेतक-यांचा मालाचा साठवणुकीकरिता अत्याधुनिक गोडाऊन बांधकाम, मालावर प्रक्रीयेकरिता उद्योग उभारणी हे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. हे स्वागताथार्य असले तरी या उपक्रमाने शेतक-यांच्या हिताची जपणूक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार यानी केले.

कुरखेडा तालूक्यातील आंधळी येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशीक यांच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आंधळी येथे धान पीकावर प्रक्रिया उद्योग (राईस मिल) ची उभारणी करण्यात आली. या प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन रविवारी सहकारमहर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करतना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा गजबे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहकारी बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांगदेव फाये, सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम, आविका संस्थेचे सभापती केशव किरसान, सरपंच दिनकर कुमरे, सरपंच उज्वला रायसिडाम, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे, लोमेश उसेंडी, नगरसेवक अॕड. उमेश वालदे, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, भात गिरणीचे अध्यक्ष बब्बू मस्तान, यशवंत चौरीकर, उध्दव गहाणे, उपसरपंच अप्रव भैसारे, सूधाकर वैरागडे, मोनेश मेश्राम आदी उपस्थित होते.

महामंडळाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जिल्हात प्रथमच आविका संस्थामार्फत धानावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आविका उपसभापती विनोद खुणे, संचालन मानिक दरवडे तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक हेमंत शेंदरे यानी केले.