विदर्भ क्रांती न्यूज
गडचिराेली : आरमोरी तालुक्यातील मौजा चुरमुरा येथे श्रीराम नवमी महोत्सव व हनुमान जयंतीच्या निमित्ताने रामायण व श्रीमद् भागवत गीता ज्ञानयज्ञ भागवत सप्ताह मोठया आनंद उत्साहाने गावातील नागरिक एकत्रित येऊन भक्तीभावनेने पुजाअर्चा करत भागवत कथा प्रवचनकार ह.भ.प. सौ.माधुरीताई बालपांडे यांच्या संपूर्ण संगीतमय संचासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या भागवत सप्ताह कथेच्या निमित्ताने खासदार अशोक नेते यांचे गावातील नागरिक शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भागवत सप्ताह कथेच्या धार्मिक कार्यक्रमाला गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट देत दर्शन घेऊन अशा धार्मिक कार्यक्रमाची आज गरज असून अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मन शुद्ध, स्वच्छ व निर्मळ ठेवावे. यातून चांगले विचार, चांगले आचार आत्मसात करून फलित करावे. या भागवत सप्ताहाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी माजी सरपंच मुखरुजी पा. देशमुख, माजी सरपंच बोबाटे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ पा. सोनटक्के, माजी उपसरपंच धुरंधर सातपुते, कवडुजी पा. म्हस्के, विजय शेंडे, तसेच मोठ्या संख्येने गावातील भाविक भक्त उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी चुरमुरा येथील सामाजिक कार्यकर्ते विजयजी शेंडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळाप्रसंगी सदिच्छा भेट देत नववधुवरांस शुभाशिर्वाद दिला.