विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देसाईगंज येथील नैनपूर वॉर्डातील माता प्रतिभादेवी मंदिरात माता प्रतिभादेवी उत्सव सोहळ्यानिमित्त गोपालकाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आमदार कृष्णा गजबे यांनी १२ मार्च रोजी भेट देऊन उपस्थित भाविक भक्तांना संबोधित केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा, शक्तीकेंद्र प्रमुख चौपनदासजी विधाते, देविदास मेश्राम, प्रमोदजी जक्कनवार, गोपालजी चौधरी, रामकृष्णजी मैंद, प्रा. शिंगाडे, निकेशजी नाकतोडे, रामकृष्णजी मैंद, गंगाधरजी चांदेवार, सुरेशजी बुल्ले, विलाशजी विधाते, नाकाडे महाराज, महेशजी राऊत, प्रमोदजी राऊत, परागजी अलोने व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







