– आ. कृष्णा गजबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
– विजेच्या समस्येबाबत बोलाविली तातडीची बैठक
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी व कोरची तालुक्यातील विजेच्या विविध प्रश्नांसंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गासोबत काल, १२ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता देसाईगंज येथील आमदार गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तत्काळ बैठक बोलावून चारही तालुक्यामधील गावलाईन व शेतीची लाईनवर होत असलेल्या अतिरिक्त लोड भार कमी करण्यासाठी गडचिरोली महावितरणचे अधिकारी एससी, इ. इ. अधिकारी आणि चारही तालुक्यातील डेप्टी अधिकारी यांच्यासोबत विद्युत समस्ये संदर्भात सविस्तर चर्चा करून आमदार कृष्णाजी गजबे यांनी वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील कृषी पंपांना नियमित लाईन तसेच गावलाईन सुद्धा नियमित चालू ठेवा, असे अधिकारी वर्गाला निर्देश दिले.
यावेळी कुरखेडा तालुक्यामधील अनेक गावातील कृषी फीडरवरच गाव लाईनचे कनेक्शन जोडल्या गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील बरेच गावातील लोकांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे कुरखेडा तालुक्यातील बरेच गावांना रात्रौ अंधारात रावून सहा तास विज संदर्भात मोठ्या समस्या उद्भवू लागले आहेत. यासंदर्भात विद्युत विभागाने लवकरात लवकर उपाययोजना आखून विद्युतच्या समस्या दूर करण्यात यावी, असे आदेशही आमदार कृष्णा गजबे यांनी दिले.
यावेळी अधिकारी वर्गाने आमदार कृष्णा गजबे यांना सांगितले की, चारही तालुक्यामध्ये विद्युत दाब होल्टेज कमी असल्यामुळे लाखांदूर वरून 33 केव्ही लाईन देसाईगंज येथे आणण्याचे पण काम चालू आहे. ब्रह्मपुरीवरून ३३ केव्ही देसाईगंज आणण्याच्या संदर्भात आढावा घेतला. हा पण काम चालू आहे असे अधिकारी वर्गाने आमदार कृष्णा गजबे यांना सांगितले असून गांगलवाडीवरून आरमोरी आणण्याच्या संदर्भात चर्चा केली तेंव्हा हा पण काम चालू असल्याचे सांगितले.
ज्या तालुक्यातील कृषी फिटर हे वेगळे नसल्यामुळे काही गावांना रात्री पुरेशी वीज मिळत नसल्यामुळे त्या गावांचा आर्थिक शैक्षणिक तसेच इतरही समस्या उदभवू नये म्हणून लोड मॅनेजमेंट बरोबर करण्याचे आदेश दिले. अश्या विविध बाबींवर चर्चा केली आणि जनतेला चांगल्या सेवा देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी विद्युत विभागातील कर्मचारी यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील विद्युत समस्या दूर करण्यासाठी तारेवरची कसरत करून विद्युत विभाग हे आपले नियोजन आराखडा येत्या दोन दिवसा तयार करीत असल्याचे सांगितले.







